तस विशेष काही घडल नाही...
बरेच दिवस blogging बद्दल ऎकल होत, वाचल होत, पण आज शेवटी ठरवलच की सुरुवात तरी करु. फुडच फुडे...
तस ब्लॉग लिहिण्यामागे हेतू (उदात्त वगैरे) आहे(उगाच खोट कशाला बोला :D ). पण ते नंतर कधीतरी...
मराठीमधे लिहिण बराहा (www.baraha.com) मुळे खूपच सोप झालय. ते पण एक निमित्त आहे ब्लॉगिंग सुरु करण्यामागे. पण त्याच बरोबर अस्सल मराठी विषयांबद्दल फार काही सापडत नाही महाजालावर हे देखिल कारण आहे. जस कि दापोलीमधे बघण्यासारख काय आहे? किंवा दुर्गा मधली भुर्जी चांगली की PD ची? किंवा अगदीच शाळा स्टाईलचा 'माझी राजगड सहल' वगैरे निबंध... अशा कशाबद्दलच फार काही मिळत नाही याच दु:ख पण होत.
आता सांगायला काही हरकत नाही की मी एक पुणेकर आहे, त्यामळे तस या ब्लॉगला विषयाच काही बंधन नाही(आणि कदाचित भाषेच पण). आणि त्याच बरोबर उच्च अभिरुचीची वगैरे अपेक्शा ठेवायला पण हरकत नाही(अस्सल पुणेरी माज!) पण उत्साह किती दिवस टिकेल ते मात्र माहीत नाही.
हा माझा मराठीत लिहायचा पहिलाच प्रयत्न(पहिलीतला वाटणार नाही अशी अपेक्षा आहे). तेव्हा क्रुपया फिरत फिरत आला असाल तर प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती.
ब्लॉगच्या विषयांबद्दल(माझ्या आवडी निवडीबद्दल) लवकरच लिहिन...
No comments:
Post a Comment